हुबळी / वार्ताहर
पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उणकल (ता. हुबळी) येथे घडली आहे. व्यंकटेश वाल्मिकी (रा. इंदिरानगर हुबळी) असे मृताचे नाव आहे. अद्यापही वेंकटेशचा मृतदेह सापडलेला नाही. गेल्या तीन दिवसांपासून अग्निशमन दल आणि विद्यानगर पोलिसांकडून मृतदेहाचा शोध सुरू आहे.
उणकल तलावात अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. तेव्हा हुबळी - धारवाड महानगरपालिका उणकल तलावाभोवती सुरक्षेसाठी उपाययोजना करत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
0 Comments