सुळगा (हिं.) / वार्ताहर

साधी 'राहणी' मात्र उच्च 'विचारसरणी' या तत्वाप्रमाणे कार्य करताना स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले सुळगा (उ.) (ता. बेळगाव) ग्रा. पं. चे सदस्य यल्लाप्पा कलखांबकर यांचा नुकताच भारत गौरव २०२२ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना नि:स्वार्थी भावनेतून सामाजिक कार्य करत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन सुशोभिता वेल्फेअर असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड, ह्यूमनवेल आणि अँटीकरप्शन इंडिया (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भारत सरकार) यांच्यातर्फे  गडहिंग्लज येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

लहानपणापासूनच वडिलांकडून राजकारणाचे धडे घेतलेले यल्लाप्पा कलखांबकर यांना राजकीय क्षेत्रात पत्नी निर्मला कलखांबकर यांची मोलाची साथ लाभत आहे. पतीच्या दीर्घ अनुभवाचा फायदा घेत निर्मला कालखांबकर यांनीही  या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो सार्थ ठरविला. 

यल्लाप्पा कलखांबकर हे सुळगा (उ.) ग्रा. पं. चे विद्यमान सदस्य आहेत. याशिवाय विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील संस्थांमध्येही ते महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. तर त्यांच्या पत्नी निर्मला कलखांबकर या ग्रा. पं.च्या अध्यक्षा आहेत. निर्मला कलखांबकर यांनी यापूर्वीही एकदा ग्रा. पं. चे अध्यक्षपद भूषविले आहे.

यल्लाप्पा कलखांबकर यांना भारत गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याने गावच्या नावलौकिकात भर पडली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.