चंदगड / लक्ष्मण यादव :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवड्यातंर्गत चंदगड तालुका भाजपतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.महिपाळगड (ता. चंदगड) येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक म्हणाले, देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर गांधी जयंती पर्यंत सेवा पंधरवड्यानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.आरोग्य, रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबीरे घेण्यात येत आहेत. गोरगरीब लोकांना, बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत केली जात आहे. या उपक्रमांचा एक भाग म्हणून देशभर सुरु असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत आज ऐतिहासिक महिपाळगडावर वृक्षारोपणासाठी निमंत्रित केल्याने समाधान वाटले असे त्यांनी सांगितले.
यानंतर बोलताना माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील म्हणाले, आज खासदार धनंजय महाडिक महिपाळगडावर वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित आहेत. महाडिक साहेब खासदार आहेतच पण यापुढे चंदगड तालुक्यात देताना फक्त खासदार म्हणून नव्हे तर आमच्या या सर्व चंदगडकरांचे केंद्राचे मंत्री म्हणून तुम्ही चंदगड तालुक्यात यावे अशी मनापासून इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. सेवा पंधरवडयांतर्गत गेल्या रविवारी कलानंदिगड येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मग छ. शिवाजी महाराजांच्या या वतन असलेल्या ऐतिहासिक महिपाळगडावर वृक्षारोपण करण्याचे ठरविण्यात आले. हा कार्यक्रम निश्चित नव्हता, असे असतानाही खा.धनंजय महाडिक आवर्जून या वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित राहिले याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
प्रारंभी नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांचा चंदगड तालुका भाजप मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सभापती शांतारामबापू पाटील , सेवा पंधरवडा संयोजक अनिल शिवणगेकर, भाजप तालुका अध्यक्ष नामदेव पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष अशोक कदम, प्रताप सुर्यवंशी, यशवंत सोनार , गणपती पाटील , सागर पाटील, रामा पाटील, मायाप्पा पाटील आदीसह मान्यवर व कार्यकर्ते उपस्थि होते.
आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यादव यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात टिपलेली अन्य छायाचित्रे.
(1)
(8)
(9)
(10)
(11)
(12)
(13)
0 Comments