श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बैठकीत निर्णय
सुळगा (हिं.) / वार्ताहर
श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सुळगा (हिं) विभागातील कल्लेहोळ गावात उद्या रविवार दि. 02 ऑक्टोबर रोजी श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कल्लेहोळ यांच्या वतीने श्री दुर्गा माता महादौडीचे आयोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सुळगा (हिं.) विभाग प्रमुख श्री. शेखर पाटील, गावप्रमुख श्री. मिलिंद पाटील, उपगाव प्रमुख श्री. संदिप पाटील तसेच सुळगा (हिं.) व कल्लेहोळ गावातील धारकरी उपस्थित होते.
तरी परिसरातील शिवभक्त आणि धारकऱ्यांनी या श्री दुर्गामाता महादौडीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
0 Comments