◾️मुरगोड येथील घटना
बेळगाव / प्रतिनिधी
मुसळधार पावसाने महादेव लक्षमप्पा बलिगद यांचे घर कोसळ्याने माय - लेकाचा दुर्देवी मृत्यू झाला. यरगट्टी (जि. बेळगाव) येथे ही हृदयद्रावक घटना घडली. प्रज्वल (वय 5), यल्लाव्वा महादेव बालिगद (वय 40) अशी मृतांची नावे आहेत.
घटनास्थळी तहसीलदार महांतेश मठद, सीपीआय मौनेश्वर माली पाटील, पीएसआय बसनगौडा नेर्ली, एएसआय वाय. एम. कटकोळ तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी केली. या घटनेची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
0 Comments