सुळगा (हिं.) : येथे उद्या सोमवार दि. 03 ऑक्टोबर रोजी श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सुळगा (हिं.) विभाग यांच्या वतीने श्री दुर्गामाता महादौडीचे आयोजन करण्यात आले आहे.
गावातील सर्व गल्ल्यांमध्ये विविध मार्गांवरून दौडीचे मार्गक्रमण होणार आहे. या पार्श्वभूमीवर दौडीच्या स्वागतासाठी गावात जय्यत तयारी करण्यात आली असून ठिकठिकाणी फुग्यांनी सजवलेल्या स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. तर गल्लीतील रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे. दौडीच्या निमित्ताने बालचमू, युवक-युवती यांचा उत्साह दुणावला असून शिवरायांच्या विचारांची प्रेरणा जागवणाऱ्या दौडमध्ये धावण्यासाठी प्रत्येकजण आतुरले आहेत.
उद्याच्या दौडमध्ये प्रा. मायाप्पा पाटील व्याख्यानातून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सुळगा (हिं.) विभाग प्रमुख , गावप्रमुख , उपगाव प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
0 Comments