चंदगड (लक्ष्मण यादव) :
नरेंद्र
मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त
सुरू असलेल्या सेवा पंधरवड्यातंर्गत
चंदगड तालुका भाजप आणि माहेर
मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल,
आजरा
यांच्या संयुक्त विद्यमाने
मोफत महाआरोग्य शिबीर माजी
राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील
यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
झाले.
प्रारंभी
राष्ट्रपिता महात्मा गांधी
जयंती निमित्त माजी राज्यमंत्री
भरमूअण्णा पाटील यांच्या
हस्ते फोटो पूजन व दिपप्रज्वलन
करण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील म्हणाले, देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवडा सुरू आहे. याचे औचित्य साधून चंदगड तालुका भाजपतर्फे राबवल्या जात असलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून हे महाआरोग्य शिबीर संपन्न होत होत आहे. अशीच आरोग्य तपासणी शिबीरे तालुक्यात विविध ठिकाणी राबवली जाणार आहेत. तेव्हा अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
भाजप
युवा मोर्चा अध्यक्ष अशोक
कदम यांनी प्रास्ताविक तर
भाजप युवा मोर्चा सरचिटणीस
लक्ष्मण यादव यांनी सूत्रसंचालन
केले.
आभार
विनायक पाटील यांनी मानले.
0 Comments