विजयपूर / वार्ताहर 

विहीरीवर आंघोळीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. विजयपूर जिल्ह्याच्या कोल्हार जवळील युकेपीनजीक ही घटना घडली.

रावत दलवाई (वय 50) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. आंघोळीसाठी गेले असताना पाय घसरल्याने तोल जाऊन ते विहिरीत पडले आणि पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 यानंतर परिसरातील नागरिकांनी कोल्हार पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी कोल्हारच्या सरकारी रुग्णालय पाठविला.

या घटनेची नोंद कोल्हार पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.