◾️श्री शिवछत्रपती स्वाभिमानी गोटमारा संघाच्यावतीने आयोजन

◾️शिवराज हायस्कूलच्या ग्राउंडवर रंगणार बेनकनहळ्ळी प्रिमीयरलिगची धूम 

सुळगा (हिं.) / वार्ताहर

बेनकनहळ्ळी येथे खास दसऱ्यानिमित्त श्री शिवछत्रपती स्वाभिमानी गोटमारा संघ बेनकनहळ्ळी पुरस्कृत भव्य अशी गाव मर्यादित बेनकनहळ्ळी प्रिमीयरलिग (बी. पी. एल.)  क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेचे यंदा ४ पर्व असून या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस रु. 25,000/- देवस्की पंच कमिटी बेनकनहळ्ळी तर दुसरे बक्षिस रु.15,000/- आर. एम. चौगुले (सिव्हिल इंजिनियर,बिल्डर्स अँड डिझायनर्स) मण्णूर यांच्याकडून देण्यात येणार आहे. याशिवाय मॅन ऑफ द सिरीज (मालिकावीर) साठी सायकल - श्री. ईश्वर ध. पिसाळे, होमथेटर - श्री. बाबू दुर्गाप्पा कोलकार, प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच (सामनावीर) चषक श्री. चन्नाप्पा शिवाजी पाटील, वैयक्तिक चषक, बेस्ट बॉलर (उत्कृष्ट गोलंदाज), बेस्ट कॅचर (उत्कृष्ट झेल),  बेस्ट बॅट्समन (उत्कृष्ट फलंदाज) साठीचे चषक श्री.अरुण मल्लाप्पा कोलकार यांच्याकडून देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेसाठी श्री.रामा गावडू पाटील (महालक्ष्मी स्पोर्ट्स), डॉ. श्री. राजू मोनाप्पा पाटील (साईराज ब्रह्मलींग स्पोर्ट्स),  श्री. बुद्धाजी कृष्णा पाटील (श्री कृष्ण स्पोर्ट्स), श्री.लक्ष्मण परशराम देसुरकर (श्री.पंत स्पोर्ट्स), श्री. सुनील गणपत खांडेकर (ब्रह्मलींग स्पोर्ट्स), श्री. अनिल पांडुरंग कांबळे (मोरया स्पोर्ट्स), श्री. यल्लाप्पा परशराम जाधव (एस.एस.स्पोर्ट्स), श्री. गजानन परशराम कुंडेकर (विघ्नहर्ता स्पोर्ट्स) असे एकूण आठ संघ मालक आहेत.

तरी या  क्रिकेट स्पर्धेला उपस्थित राहून सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे गावातील क्रिकेटप्रेमींना करण्यात आले आहे.