◾️सुळगा (हिं.) येथे सहाव्या दिवशी दौडला उस्फूर्त प्रतिसाद

 फोटो सौजन्य : श्री. विक्रम (हरि) जोतिबा जाधव,
                                                  (सुळगा, हिं.) 

सुळगा (हिं.)/ वार्ताहर  

श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित सुळगा (हिं.) येथील सहाव्या दिवशीच्या दुर्गामाता दौडला  ब्रह्मलिंग गल्ली येथून प्रारंभ झाला. प्रारंभी गल्लीतील शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे बेळगाव तालुका कार्यवाहक श्री. कल्लाप्पा परशराम पाटील यांच्या शुभहस्ते ध्वज चढविण्यात आला. 

यानंतर श्री. गणपती, छ. शिवाजी महाराजांची आरती करून प्रेरणामंत्र म्हणून दौडची सुरुवात झाली. यानंतर प्रमुख मार्गाने संपूर्ण गावात फिरून पुन्हा ब्रह्मलिंग गल्ली येथे आल्यावर ध्येयमंत्रा नंतर  श्री. गणेश उत्सव युवक मंडळ ब्रह्मलिंग गल्लीचे अध्यक्ष श्री. पिराजी लक्ष्मण चौगुले यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. यानंतर सहाव्या  दिवशीच्या दौडची सांगता झाली.

दौडमध्ये बालचमू, युवक-युवती आणि धारकऱ्यांचाही सहभाग आणि उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळाले. दौडीत पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या युवतींमुळे मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडले.