श्री गणरायास साश्रू नययांनी निरोप

विजयपूर / दिपक शिंत्रे

विजयपूर येथील भावसार क्षत्रिय समाजाच्यावतीने प्रतिष्ठपना करण्यात आलेल्या श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक शहरातील सराफ बाजार येथील भावसार भवनात पासून सुरूवात होऊन श्री गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत बॅन्जोचा तालावर वाजत गाजत ऐतिहासिक ताजबाऊडी पर्यंत जाऊन श्री गणरायास भक्तीपूर्ण वातावरणात व अश्रू नययांनी निरोप देऊन विसर्जन करण्यात आले.

याप्रसंगी समाज पंचमंडळाचे सेक्रेटरी दिपक शिंत्रे, सदस्य विजय नवले, अतुल पुकाळे, शिवप्पा देवगिरीकर, श्रीनिवास जवळकर, रमेश हंचाटे, उमेश देवगिरी युवक समितीचे अध्यक्ष विशाल पुकाळे, नितीन शिंत्रे, नितीन मिरजकर, विशाल जवळकर, तरुण संघाचे अध्यक्ष विनायक कुंटे व सदस्य व इतर समाज बांधव सहभागी झाले होते.