बेळगाव ग्रामीण शेतकरी चिंतेत

बसवण कुडची / वार्ताहर 

बेळगाव ग्रामीण भागात गुरांच्या विचित्र आजाराने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे.  बसवण कुडची आणि बसरीकट्टी गावातील प्रत्येकी दोन बैलांचा या विचित्र आजाराने मृत्यू झाला आहे.

बसवण कुडची गावातील सचिन खोकळेकर यांच्या बैलाचा या विचित्र आजाराने मृत्यू झाला. तर काल तानाजी गल्लीतील नामदेव मुतगेकर यांच्या बैलाचा अशाच विचित्र आजाराने मृत्यू झाला होता.

बसवण कुडची गावातील 16 हून अधिक बैलांना हा आजार झाला असून अनेक जनावरे दगावली आहेत. या आजाराचे नमुने बेंगळूरला पाठवण्यात आले आहेत. आजूबाजूच्या बसवण कुडची, निलजी, बसरीकट्टी, शिंदोळी, मुचंडी, सांबरा या गावांमध्ये हा आजार वाढला असून काल बसरीकट्टी गावातही २ बैलांचा मृत्यू झाला आहे.

रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही मालकांनी बाधित बैलांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या रोगासाठी योग्य औषध देण्याची आणि बाधित बैलांचे संरक्षण करण्याची गरज आहे.