विजयपूर / दिपक शिंत्रे
विजयपुरातील आदिलशाहीच्या काळातील श्री. नरसिंह मंदिर हे ग्रामदैवत आहे. इ. स. १९५३ मध्ये या मंदिराच्या पंच मंडळीनी सार्वजनिक गणपती बसविण्याचा ठराव केला.
तेंव्हा पासून गेली ७० वर्षे या मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. श्री. गजाननाची आरास करतानां कुडगी येथील नागवेलींची पाने (विड्याची पाने) वापरून मखर केली जाते. यंदा १०८ श्री. सत्यनारायण सामुहिक पूजा करण्यात आली. या वेळी १०८ जणांनी पुजेत भाग घेतला.
या मूर्तीच्या दोन्ही मिरवणूका (आगमन आणि विसर्जन) मोठ्या भक्तीभावाने, भजन आणि नामस्मरणाने आयोजित करण्यात येतात. हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.
0 Comments