जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांची कारवाई

एकूण 86 वाहन चालकांना ठोठावला  दंड


बेळगाव / प्रतिनिधी

नियमांचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी मुलांची वाहतूक करणारी वाहने अडवून पोलिसांनी चालकांकडून दंड वसूल केला.

मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बेळगाव जिल्ह्यातील पोलिसांनी  विविध भागात एकाच वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी मुलांची वाहतूक करणारी एकूण 86 वाहने अडवून चालकांवर कारवाई केली. संबंधित चालकांवर एकूण 129 गुन्हे दाखल करण्यात आले असून 45800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.