बेळगाव : लक्ष्मी नगर, मुतगा येथील रहिवासी अक्षता लक्ष्मण पाटील (वय 24) हिचे आज सोमवारी दुपारी 1:30 वाजता आकस्मिक निधन झाले. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. एलआयसीचे प्रतिनिधी लक्ष्मण पाटील यांची ती मुलगी होती. अक्षताने नुकतेच बीई सिव्हीलचे शिक्षण पूर्ण केले होते. तिच्या आकस्मिक निधनामुळे लक्ष्मीनगर परिसरात हळहळ होत आहे.
0 Comments