![]() |
मासिक सभेला उपस्थित मिरज माहेर मंडळाच्या महिला सदस्या . (फोटो सौजन्य : सौ. अस्मिता आळतेकर, बेळगाव) |
बेळगाव दि. १९ सप्टेंबर :
मिरज माहेर मंडळाची सप्टेंबर महिन्याची मासिक सभा आर. पी. डी. येथील गणेश एम्पायर येथे सौ.राधा मुरगोड यांच्या घरी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी काही बौद्धीक खेळांचे आयोजन केले होते. त्यात शोभा लोकुर,पुजा नातू,वर्षा बाळेकूंद्री,सुवर्णा श्रेयकर यांनी पहिला दुसरा असे क्रमांक पटकावले.
सध्या हस्त नक्षत्र सुरू असल्याने पारंपारिक पद्धतीने हादग्याची गाणी म्हणत सुंदर हादगा खेळण्यात आला.हादग्याची खिरापत ओळखण्यात चढाओढ दिसून आली. सप्टेंबर महिन्यातील वाढदिवस असलेल्या मैत्रिणी व खेळ विजेत्या मैत्रिणींना भेटवस्तू देण्यात आली.
0 Comments