- बेळगावातील एकजण वर्षभरासाठी हद्दपार
- पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांचा यांचा आदेश
जिल्ह्यात जुगार खेळण्यास प्रोत्साहन देणाऱ्यां विरोधात पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जुगार खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्यांना वर्षभरासाठी हद्दपार करण्याचा आदेश त्यांनी बजावला आहे.
याप्रकरणी शहरातील परशुराम बाबू मैत्री (रा. अनगोळ) याला दि. 19 सप्टेंबर 2022 ते 18 सप्टेंबर 2023 या कालावधीत जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार केल्याची माहिती पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी दिली आहे. संबंधिता विरोधात एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी चार प्रकरणांमध्ये न्यायालय दोषी ठरला होता. यानंतर अनेकदा ताकीद देऊनही त्याने इतरांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करण्याचे काम त्याने सुरूच ठेवले होते. त्यामुळे त्याला एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याचे रवींद्र गडादी यांनी सांगितले.
0 Comments