• आर्थिक मदतीबद्दल गणेशोत्सव मंडळांची कृतज्ञता
  • आ. लक्ष्मी हेब्बाळकर,श्री.मृणाल हेब्बाळकर यांचे मानले आभार

 [फोटो सौजन्य : श्री. यल्लाप्पा कलखांबकर,
ग्रा. पं. सदस्य,सुळगा (उ.) ग्रामपंचायत]
सुळगा (हिं.)/वार्ताहर 

बेळगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सेवाभावी-युवक मंडळांची संख्या मोठी आहे. समाजकार्यात या मंडळांचा नेहमीच पुढाकार असतो. तसेच सामाजिक सलोखा वाढावा म्हणून सर्व  सण-उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरे करण्यासाठी मंडळांची महत्त्वाची भूमिका असते.

मात्र हे सर्व करत असताना या मंडळाना पाठबळ देण्याची गरज असते. ही गरज ओळखून बेळगाव ग्रामीणच्या लोकप्रिय आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर सातत्याने या मंडळांच्या  कार्याचे कौतुक करत त्यांना आर्थिक मदत करत असतात.

यंदाही गणेशोत्सवात ग्रामीणच्या लोकप्रिय आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर आणि मृणाल हेब्बाळकर साहेब यांनी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील सुळगा (उ.) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आर्थिक मदत दिली.


आर्थिक मदत दिलेल्या गणेशोत्सव मंडळांचा तपशील खालीलप्रमाणे :

1. शिवशक्ती युवक मंडळ शंकर गल्ली, सुळगा

2. संगोळी रायण्णा मंडळ,सुळगा 

3.गणपत गल्ली गणेशोत्सव मंडळ, सुळगा 

4.ब्रह्मलिंग गल्ली गणेशोत्सव मंडळ सुळगा

5.लक्ष्मी गल्ली युवक मंडळ,सुळगा

6.हळदी युवक मंडळ,सुळगा

7.मारुती गल्ली युवक मंडळ, सुळगा

8.आंबेडकर गल्ली युवक मंडळ, सुळगा 

9. मरगाई गल्ली युवक मंडळ, सुळगा

या मंडळांना आर्थिक सुपूर्द केली. मदतीबद्दल वरील सर्व मंडळांचे अध्यक्ष- उपाध्यक्ष, सभासद, गावच्या  सर्व गल्ल्यामधील युवक मंडळे, महिलावर्गाने ग्रामीण भागाच्या लोकप्रिय आमदार सौ. लक्ष्मीताई हेब्बाळकर व मृणालसाहेब हेब्बाळकर यांचे मनापासून आभार मानले आहेत.





याप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्षा निर्मला कलखांबकर, रेखा पाटील, दिपा तोरे, रेणुका कांबळे, भागाण्णा नरोटी, यल्लाप्पा कलखांबकर, उमेश पाटील, भैरू पाटील, गणपत गडकरी, प्रितेश पाटील, संतोष पाटील, गंगाराम नरोटी यांच्यासह इतर कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.