• भाजप ग्रामीण मंडळ,अध्यक्ष धनंजय जाधव यांची माहिती
  • विजयनगर येथील कार्यालयात घेतली पत्रकार परिषद 

 (पत्रकार परिषदेत माहिती देताना भाजप ग्रामीण मंडळाचे
 अध्यक्ष धनंजय जाधव, समवेत इतर पदाधिकारी) 

सुळगा (हिं.)/वार्ताहर  

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण जगात अमेरिकेसह सर्व देशांच्या नेत्यांपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत. उद्या 17 सप्टेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात भाजपतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. विजयनगर (हिं.) येथील भाजप ग्रामीण मंडळ कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली.

या पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय जाधव म्हणाले, बेळगाव ग्रामीण मंडळाच्या वतीने आम्ही उद्या शनिवारी गणेशपूर, ज्योती नगर येथे तसेच 18 सप्टेंबर रोजी आंबेवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या 15 दिवसात आम्ही एकूण 8 गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि औषध वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे आम्ही 21 सप्टेंबर रोजी ग्रामीण मंडळ कार्यालयात रक्तदान शिबीर, 25 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन 292 बूथमध्ये करणार आहोत. 25 ते 29 सप्टेंबरपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती लोकांना देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे असे जाधव यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला ग्रामीण मंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.