• कापलेले गवत शेतात पसरवत असताना घडली घटना


विजयपूर / वार्ताहर 

शेतात गवत टाकताना साप चावल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील बेनकोटगी गावात ही घटना घडली.

निंगनगौडा बिरादार (वय 53, रा.बेनकोटगी ता. सिंदगी, जि. विजापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शेतातील गवत कापून नंतर ते शेतात पसरवत असताना घोणस जातीचा विषारी साप चावल्याने  निंगनगौडा बिरादार यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सिंदगी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे.