- सोने - पैशाच्या हव्यासापोटी नातेवाईकांचे कृत्य
- सिंदगी तालुक्याच्या गुब्बेवाड गावातील घटना
विजयपूर / वार्ताहर
नातेवाईकांनी पैशाच्या आणि सोन्याच्या मागणीसाठी वृद्ध महिलेला मारहाण करून तिचे सोने आणि पैसे लुटल्याची घटना विजापूर जिल्ह्याच्या सिंदगी तालुक्यातील गुब्बेवाड गावात घडली.अयम्मा अशोक गडते असे मारहाण झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
श्रीशैल अलूर, रेणुका अलूर, वीरेश अलूर, इराप्पा अलूर, प्रभू अलूर, सत्यव्वा अलूर यांनी तिला मारहाण केली. तसेच अय्यम्मावर प्राणघातक हल्ला करून 13 तोळे सोने व बँकेतील 4 लाखांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कलकेरी पोलिस स्थानकात मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments