चिक्कोडी / वार्ताहर
श्री महालक्ष्मी उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी दिल्याबद्दल माजी खा. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखालील चिक्कोडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.
चिक्कोडी तालुक्यातील शेतजमिनीच्या सिंचनासाठी आणि पाण्याच्या दृष्टीने श्री महालक्ष्मी उपसा जलसिंचन योजना खूप महत्वाची आहे. या योजनेला मंजुरी द्यावी अशी या भागातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यावेळी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्याना कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीची प्रतिमा भेट दिली.
यावेळी हुबळीचे आ. अरविंद बेल्लद, माजी एमएलसी महांतेश कवटगीमठ यांच्यासह शेतकरी नेते उपस्थित होते.
0 Comments