हुबळी / वार्ताहर 

कर्नाटक आरोग्य संजीवनी योजना लागू करण्याच्या मागणीसाठी हुबळी- धारवाड महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने महापालिका आवारात आंदोलन करण्यात आले.

 महापालिका आणि स्थानिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

 या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील महानगर महामंडळाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या सर्व अधिकारी व नागरी कर्मचाऱ्यांसाठी कर्नाटक आरोग्य संजीवनी योजना लागू करण्यासाठी महापालिका आवारात बुधवारी आंदोलन केले.

 हुबळी - धारवाड महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर पेरूर यांनी याबाबत भूमिका मांडली