◾️संजीवनी आरोग्य योजनेचा लाभ द्या 

◾राज्य शासनाकडे करण्यात आली मागणी

◾️घोषणा देत महापालिकेसमोर निदर्शने


बेळगाव / प्रतिनिधी 

राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संजीवनी आरोग्य योजनेत समाविष्ट केले नाही. केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना संजीवनी आरोग्य योजना उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आज बेळगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले.


यावेळी आपल्या मागणी संदर्भात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाही दिल्या. त्यामुळे  महापालिका कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले .


यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाकडे संजीवनी आरोग्य विम्याचा लाभ मिळावा अशी जोरकस मागणी केली केली.