◾️शिवप्रतिष्ठान उचगाव विभागातर्फे स्वागत
◾️32 मण सुवर्ण सिंहासनासाठी निधी सुपूर्द
![]() |
32 मण सुवर्ण सिंहासनासाठी श्री.संभाजी भिडे गुरुजींकडे निधी सुपूर्द करताना,श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते (फोटो सौजन्य : श्री. मिथील जाधव, उचगाव ) |
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सोमवारी उचगावला धावती भेट दिली. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव विभाग आणि ग्रामस्थांतर्फे भिडे गुरुजी यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी उचगावच्या श्री. शिवस्मारक येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात श्री. शिवस्मारक उचगाव येथे नित्यपूज्येवेळी 32 मण सुवर्ण सिंहासनासाठी निधी म्हणून जमा झालेली रु. 11,000/- ची रक्कम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव जिल्हाप्रमुख किरण गावडे, उचगाव विभागप्रमुख मिथील जाधव, नित्य पुजक धारकरी व ग्रामस्थ धारकरी कार्यकर्ते, शिवभक्त नागरिक उपस्थित होते.
0 Comments