नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पिवळी साडी
साडी परिधान करून पारंपरिक वेशभूषेत 
सौ.गीतांजली (नीता) रामचंद्र हुलजी.
(फोटो सौजन्य : कु.ऋतुराज हुलजी)
 गोकुळनगर (हिं.), बेळगाव

नवरात्रीमध्ये दुर्गामातेच्या नऊ दिवसांचे वेगवेगळे महत्त्व आहे. दुर्गा मातेची प्रत्येक रूपं तिच्या वेगवेगळ्या शक्तींसाठी ओळखली जातात. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीची संबंधित पूजा, नवरात्रीचे नऊ रंग, आराधना आणि व्रत केले जातात. त्या नऊ रंगांचे या नऊ दिवसांमध्ये विशेष महत्त्व आहे.

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पिवळी साडी
परिधान करून हातात औक्षणाचे तबक घेतलेल्या
 सौ. माया प्रसाद पाटील
 [फोटो सौजन्य : श्री. प्रसाद पाटील, सुळगा (हिं.)]

यंदाच्या शारदीय नवरात्रौत्सवात पहिल्या तीन दिवसांमध्ये तीन माळांना अनुक्रमे पांढरा, लाल, आणि निळ्या रंगाचे महत्त्व आपण जाणून घेतले आहे.


(नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पिवळ्या
                                                      रंगाची नऊवारी साडी परिधान करून
                                                       अस्सल मराठमोळ्या पेहरावातील
                                                           (सौ. यक्षिणी मयुर पाटील)
                                                    [फोटो सौजन्य :सौ. यक्षिणी पाटील,पुणे]

गुरुवार दि. 29 सप्टेंबर 2022 : चौथी माळ

आजचा रंग : पिवळा

रंगाचे महत्त्व :

प्रत्येक शुभ कार्यासाठी पिवळ्या रंगाचा उपयोग होतो उदा.फुल, हळद, देवाची वस्त्र, पूजेच्या वेळी पिवळे पितांबर नेसतात, मुलीच्या लग्नात पहिली साडी ही पिवळीच नेसवतात आणि सूर्यकिरणांशी संबधीत असा हा मन प्रसन्न, प्रफुल्लित करणारा पिवळा रंग आहे. म्हणजेच पिवळा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो. मनोविज्ञानातील सगळ्यात शक्तिशाली आणि अवघड अशी पिवळ्या रंगाची ओळख आहे. बौद्धिक विकासासाठी, एकाग्रतेसाठी आणि मानसिक शांतेतेसाठी पिवळा रंगाचे महत्त्व अधिक आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती प्रसन्न, आनंदी दिसते आणि चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते. आपल्यामध्ये विश्वास आणि मैत्रीची भावना वाढवण्याचे काम पिवळा रंग करत असतो.