◾️ सुळगा (हिं.) येथील दुर्गामाता दौडला उदंड प्रतिसाद
◾️चौथ्या दिवशीही उत्साहात पार पडली दौड
![]() |
सुळगा (हिं.) / वार्ताहर
गुरुवारी चौथ्या दिवशीच्या दौडची सुरुवात मारुती गल्लीतील मारुती मंदिरापासून झाली. गावातील प्रमुख धारकऱ्यांच्या हस्ते ध्वज चढवून प्रेरणा मंत्र, श्री. गणपती, छ. शिवाजी महाराजांची आरती करून दौडला प्रारंभ झाला.
युवा पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची जागृती निर्माण करणाऱ्या दौडमध्ये गावातील लहान मुले, युवक-युवती, उत्साहाने सहभाग घेत आहेत. दौडमुळे भावी पिढीला संस्कृती आणि धार्मिक शिक्षण मिळत आहे. आजच्या चौथ्या दिवशीही दौडला उदंड प्रतिसाद लाभला. गावातील प्रत्येक गल्लीत सुहासिनींनी औक्षण करून दौडीचे स्वागत केले. यावेळी छ. शिवाजी महाराज की जय, स्वराज्यरक्षक धर्मवीर छ. संभाजी महाराज की जय असा जयघोष करण्यात आला.
गावातील सर्व गल्ल्यांमध्ये फिरून पुन्हा मारुती गल्लीतील मारुती मंदिराकडे आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. यानंतर ध्येय मंत्राने दौडची सांगता करण्यात आली. याप्रसंगी गावातील छोटा धारकरी कु. अविनय जोतिबा पाटील याने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त रायगडावर संस्थापित करण्यात येणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासनासाठी रु.501/- धनादेश श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सुळगा (हिं.) चे गावप्रमुख उपगाव प्रमुख, धारकऱ्यांकडे सुपूर्द केला.
0 Comments