◾️मंगळवारी दांडिया स्पर्धेने कार्यक्रमाचा शुभारंभ
लहान मुलांच्या दांडिया स्पर्धेचे उद्घाटन करताना
विठ्ठल नरोटी समवेत मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते
(फोटो सौजन्य : नागराज 6.0 फोटोग्राफी )
सुळगा (हिं.) / वार्ताहर : येथील सीमेदेव युवक मंडळाने सालाबाद प्रमाणे यंदाही नवरात्रीनिमित्त येत्या 10 दिवसात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंगळवारी लहान आणि मोठ्या मुलांच्या दांडिया स्पर्धेने कार्यक्रमांना सुरुवात झाली.लहान मुलांचा दांडिया स्पर्धेचे उदघाटन विठ्ठल नरोटी यांच्या हस्ते तर मोठ्या मुलांच्या दांडिया स्पर्धेचे उदघाटन वनशिका मुल्य यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर लहान व मोठ्या गटातील स्पर्धकांनी सादर केलेल्या दांडिया नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, गल्ली तसेच गावातील रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
सामाजिक कार्यात आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग असणाऱ्या सीमेदेव युवक मंडळाने यंदा आपल्या कारकिर्दीची 10 वर्षे पूर्ण केली आहेत. याच पार्श्वभूमीवर गावातील नवोदित बालकलाकार आणि युवक-युवतींना आपले कलागुण सादर करता यावेत, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा मंडळाचा मानस असून मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी दि. 30 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेतही मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments