◼ प्रवाशांची गैरसोय : वाहनचालकांवर कारवाईची नागरिकांची मागणी
गोवा दि. २४ सप्टेंबर :
गोवा - बेळगाव राज्य महामार्गावरून चोर्ला घाट मार्गे अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वारंवार होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी यामुळे अधिकाऱ्यांना अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यास भाग पाडले आहे. तसा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकऱ्यांमार्फत नुकताच काढण्यात आला आहे.
मात्र सदर आदेश झुगारून या मार्गावरून ओव्हरलोड वाहनांची वाहतूक बिनबोभाटपणे सुरूच आहे. यामुळे या रस्त्याचे नुकसान होण्याबरोबरच बेळगाव आणि गोव्यातील प्रवाशांचीही मोठी गैरसोय होत असून येथील स्थानिक रहिवाशांमधील नाराजी वाढत आहे.
मार्गा लगतच्या गावांतील रहिवाशांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना असेच आदेश लागू करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.
कारवाई न झाल्यास आंदोलन
गोव्याच्या उच्चाधिकाऱ्यांनी या बंदी आदेशाची पूर्ण अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास रास्तारोको आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
0 Comments