- रायबाग पोलिसांची कारवाई
- सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक
रायबाग
/ वार्ताहर
गत
फेब्रुवारी महिन्याच्या 4
तारखेला रायबाग
तालुक्यातील बावन सौंदत्ती
येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
झाला होता. या घटनेच्या
तपासात रायबाग पोलिसांना यश
आले असून खाजासाब बाबासाब
मुजावर (वय 25, रा. बावन
सौंदत्ती ता. रायबाग) याला पोलिसांनी अटक केली
आहे.
खाजासाब
मुजावर याने लोखंडी रॉडच्या
साहाय्याने टीएमचा दरवाजा
फोडून एटीएम मध्ये चोरीचा
प्रयत्न केला होता. ही
घटना सीसीटीव्हीत कैद झाली
होती. त्या
फुटेजच्या आधारे रायबाग
पोलिसांनी तपास करून आरोपीला
अटक केली आहे. याप्रकरणी
रायबाग पोलीस स्थानकात संबंधित
विरोधात गुन्हा नोंदवण्यात
आला असून अधिक तपास सुरू आहे.
0 Comments