बेळगाव, दिनांक 28 (प्रतिनिधी) :
पुणे - बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हलग्यानजीकच्या सर्विस रोडवर नॅनो कार उलटली मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
ही कार बेळगावहून हुबळीच्या दिशेने जात असताना हलग्यानजीकच्या सर्विस रोडवर असणाऱ्या राईस मिलजवळ ही घटना घडली.
या कारमधून आजी - आजोबा प्रवास करीत होते. मात्र सुदैवाने किरकोळ दुखापती व्यतिरिक्त त्यांना अन्य कोणतीही दुखापत झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार कारमधून प्रवास करणारे आजी - आजोबा बेळगावमध्ये बाजार करून कारने हुबळीला निघाले असताना हा अपघात झाला.
कार उलटताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेऊन कार मधील वयोवृद्ध आजी-आजोबांना कारमधून बाहेर काढले. त्यानंतर शासकीय 108 रुग्णवाहिकेला ही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सुदैवाने किरकोळ दुखापती व्यतिरिक्त काहीच न घटल्याने मदतीस धावलेल्यानी नि:श्वास सोडला.
0 Comments