◾️सुळगा (हिं.) येथे अमाप उत्साहात तिसऱ्या दिवशीची  दौड संपन्न

सुळगा (हिं.) / वार्ताहर

पहाटेच्या वेळी लवकर उठून दारोदारी रांगोळ्या काढून भगवा आणि पारंपरिक पेहराव घालून शिवभक्त धावताहेत दौडमध्ये. दौडचा उत्साह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशी धारकरी यांनी शिवभक्तांच्या लक्षणीय उपस्थितीत दौड संपन्न झाली.

प्रारंभी सुळगा येथील हळदी युवक मंडळ या ठिकाणी श्री. शिवाजी गावडू पाटील यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. यानंतर प्रेरणामंत्र, श्री. गणपती व छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून दौडला प्रारंभ झाला.


आज सुळगा विभागातील हिंडलगा गावात  सुळगा आणि हिंडलगा गावातील धारकऱ्यांनी एकत्रितपणे दौड काढली. यावेळी हिंडलगा गावात गल्लोगल्ली कमानी उभारण्यात आल्या होत्या.

ठिकठिकाणी दौडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.  शेवटी विठ्ठल मंदिरासमोर आल्यानंतर ध्येयमंत्र म्हणून ध्वज उतरविण्यात आला आणि दौडीची सांगता करण्यात आली.