खानापूर / वार्ताहर
खानापुर तालुक्यातील गर्लगुंजी ग्रामपंचायत क्षेत्रात सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरल्याची परिस्थिती निर्माण झाली.
सांडपाणी व पावसाच्या पाण्याचा सहज निचरा करून देण्याचे काम ग्रामपंचायतींना करावे लागते. मात्र मुख्य रस्त्यालगत ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने घरांमध्ये पाणी शिरुन नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
रस्त्यांवर पाणी साचून रस्ते खराब होत आहेत. तेव्हा तालुका प्रशासनासह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
0 Comments