खानापूर /वार्ताहर
खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी गावात जय हनुमान गजानन युवक मंडळ यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते खानापूर मतदार संघाचे ए दिलीप कुमार उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ए दिलीप कुमार यांनी शिक्षक दिनानिमित्त सदर कार्यक्रम आयोजित केला असून शिक्षकांनी शिकवलेल्या विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमांमध्ये बक्षीस वितरण करत असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना आणि युवकांना मार्गदर्शन केले.
यावेळी ते म्हणाले की युवक महिला विद्यार्थी आणि वृद्ध यांनी एकत्रित येऊन गावाची परंपरा जपून ठेवली आहे तशीच पुढेही त्यांनी जपून ठेवावी. येथील विद्यार्थ्यांमध्ये अनेक कलागुण आहेत. त्यामुळे शिक्षकांनी आणि पालकांनी आपल्या मुलातील कलागुण जाणून घेऊन त्यांना प्रोत्साहन करण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी त्यांनी येथील ग्रामपंचायतला डास प्रतिबंधक फवारणी मशीनचे देखील वितरण केले. गेल्या काही दिवसांपूर्वी येथील शाळेमध्ये रांगोळी मेहंदी क्वीज, सामूहिक नृत्य गायन यासह विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यावेळी या विविध स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ए दिलीप कुमार यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
प्रारंभी ए दिलीप कुमार यांचे हिरेहट्टीहोळी गावात आगमन झाल्यानंतर ढोल ताशांच्या वाद्यात स्वागत करण्यात आले तसेच महिलांनी दोन्ही बाजूंनी कलश घेऊन त्यांच्यावर पुष्पृष्टी करत त्यांना व्यासपीठापर्यंत आणले.
यावेळी ईशस्तवन आणि स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ए दिलीप कुमार यांचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुण्याचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यानंतर ए दिलीप कुमार यांच्या वतीने येथील ग्रामपंचायतीला डास प्रतिबंधक फवारणी मशीनचे वितरण करण्यात आले. तसेच शिक्षक दिनानिमित्त येथील शिक्षकांचा सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाला जय हनुमान युवक मंडळाचे कार्यकर्ते महिला मंडळ शिक्षक विद्यार्थी तसेच हिरेहट्टीहोळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments