बेळगाव / प्रतिनिधी

नाच रे मोरा आंब्याच्या वनात‘ हे गाणे ऐकताच सुंदर पिसारा फुलवून देहभान हरपून मनमोहक नृत्य करणाऱ्या मोराची छबी नजरेसमोर येते. बेळगावच्या व्हॅक्सिन डेपोतही आज हीच अनुभूती आली. कुंद पावसाळी वातावरणात मोराने केलेल्या या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोमवारी सकाळी ढगाळ आणि पावसाळी वातावरण होते.त्या वातावरणात व्हॅक्सिन डेपोमध्ये एक मोर बेधुंदपणे नाचला. मोर काळ्याकुट्ट ढगांकडे पाहतो आणि आपली पिसे उलगडतो आणि गातो अशी कविमनाची कल्पना साकारली. हे पाहणाऱ्या कोणीतरी मोराचा बेधुंदपणे नाचतानाचा व्हिडिओ बनवला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक मोराच्या नृत्याने मंत्रमुग्ध झाले.