चंदगड (लक्ष्मण यादव) : तालुका भाजपच्या वतीने मंगळवार दि. 27 सप्टेंबर रोजी चंदगड भाजपा कार्यालयात मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरासह राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा होत असून विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमांचा भाग म्हणून आयोजित केलेल्या या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
धन्वंतरी अर्बन व स्वराज्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचे या शिबीराला सहकार्य लाभणार आहे. चंदगड तालुक्यातील जनतेने या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे चंदगड कार्यकारणी सदस्य लक्ष्मण यादव, गणपती पाटील, सागर पाटील यांनी केले आहे.
0 Comments