विजयपूर (दिपक शिंत्रे) : 

विजयपूर येथील बीएलडीई संस्थेच्या श्रीमती बंगारम्मा सज्जन महिला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची बी.काॅम. पहिल्या वर्षाची विद्यार्थीनी अन्नपूर्णा भोसले हिची 19 वर्षा खालील कर्नाटक महिला टि-20 क्रिकेट संघात निवड झाली आहे.

कर्नाटक राज्य क्रिकेट संस्थेने 15 खेळाडूंची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये अन्नपूर्णा भोसले हिची विकेट किपर, फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे.  हैद्राबाद येथे दि. 1ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत महिला टि-20 स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यामध्ये अन्नपूर्णा भाग घेणार आहे.

अन्नपूर्णा हि 2019 साली 16 वर्षा खालील एकदिवसीय क्रिकेट संघात निवड झाली होती. तर 2021 साली 19  वर्षा खालील एकदिवसीय क्रिकेट संघात निवड झाली होती 2020 साली करोना मुळे राज्य क्रिकेट संघाची निवड करण्यात आली नव्हती.

बीएलडीई संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री एम.बी.पाटील यांनी अन्नपूर्णा भोसले हिचं अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.