विजयपूर / वार्ताहर
कर्नाटक राज्य पत्रकार संघटनेच्यावतीने आज विजयपूर जिल्ह्याच्या चडचण तालुक्यात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चडचण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश बिरादार यांच्या तर प्रमुख पाहुणे म्हणून नागठाण मतदार संघाचे माजी आमदार विठ्ठल कठकधोंड उपस्थित होते.
या कार्यक्रमात एसएसएलसी आणि पीयूसी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या पत्रकारांच्या पाल्यांचा गौरव करण्यात आला. याच बरोबर वृत्तपत्र विक्रेते तसेच माजी सैनिकांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश करजोळ, विजयपूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संगमेश छुरी, प्रधान कार्यदर्शी मोहन कुलकर्णी, उपाध्यक्ष चंद्रशेखर मणूर, खजिनदार राहुल आपटे उपस्थित होते.
0 Comments