![]() |
पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या यांच्याशी चर्चा करताना मा.आमदार, श्री.अभय पाटील यांच्यासह लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी |
सालाबादप्रमाणे बेळगावमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी उपस्थित होणाऱ्या विविध मुद्यांसाठी दक्षिण आमदार व लोकमान्य टिळक महामंडळाचे मानद अध्यक्ष श्री. अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळतर्फे पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांची भेट घेऊन गणेशोत्सव संदर्भातील उद्भभवणाऱ्या विविध समस्यावर चर्चा करण्यात आल्या.
गणेशोत्सव साजरा करण्याकरिता शहरातील विविध मंडळांना विविध प्रकारच्या परवानगी घ्याव्या लागतात या पार्श्वभूमीवर लोकमान्य गणेशोत्सव महामंडळातर्फे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करून त्यात असे नमूद केले आहे की, कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत ज्या मंडळांनी गणेशोत्सवासाठी परवानगी घेतली नाही त्या मंडळांची या वर्षात अडवणूक होऊ नये. सार्वजनिक गणेश मंडळांना सालाबादप्रमाणे देण्यात येणाऱ्या परवानग्या या तशाच ठेवण्यात याव्यात. वाद्य मिरवणूक संपेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात यावी . ज्या मंडळाच्या गणेश उत्सवाचे आगमन सोहळे असतील त्या मंडळाच्या ठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात यावेत व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. गणेश मंडळांना परवानगी देतांना कागदपत्रांसाठी अडवणुकीचे धोरण न बाळगता सर्व परवानग्या ह्या "एक खिडकी योजना" अंतर्गत देण्यात याव्या. तसेच गणेशोत्सव काळात व्यापार उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने रात्री वेळेचे बंधन न घालता व्यापारांचा जोपर्यंत त्यांचा व्यापार सुरू आहे तोपर्यंत त्यांना सुरू ठेवण्याचे अनुमती देण्याचे मागणी आमदार अभय पाटील यांनी केली.
सर्व परवानग्या देण्याचे अधिकार त्या त्या भागातील स्थानिक पोलीस ठाण्याला देण्यात यावे. पोलीस आयुक्तालयामार्फत एक असा अधिकारी नेमावा कि जो सर्व गणेश मंडळांच्या अडचणी दूर करू शकेल. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी याविषयी लवकरच बैठक बोलविण्यात येईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले.
यावेळी बेळगाव लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष विजय जाधव, हेमंत हावळ, गिरीश धोंगडी, प्रवीण पाटील, नितीन जाधव, रवी कलघटगीसहआदी उपस्थित होते.
0 Comments