दिपक शिंत्रे / विजयपूर
प्रतिवर्षाप्रमाणे भावसार क्षत्रिय समाज महिला मंडळाच्या वतीने भावसार भवन सराफ बाजार येथे गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली.
प्रारंभी श्री कृष्ण जन्माष्टमी पाळणा पूजा करण्यात आली. दुरवी सुलाखे, रियांश बासुतकर, मनीष झिंगाडे, साईराज सुलाखे, आराध्या तेलकर मनय सुलाखे यांच्यासह अनेक बाळगोपाळांनी राधा-कृष्ण वेषभूषा स्पर्धेत भाग घेतला होता. सासू-सूनांचा राधा-कृष्ण नृत्य सौ. रेणुका हंचाटे व सौ. प्रियंका हंचाटे यांनी सादर केला.
या कार्यक्रमात महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पद्माताई इजंतकर, सौ. लता झिंगाडे, सौ. शैला महिंद्रकर, सौ. निर्मला सुलाखे, सौ.लक्ष्मी तेलकर, सौ. रुपाली हंचाटे, सौ. नंदा पुकाळे, सौ. मयुरी सुलाखे सौ, राजश्री हिरासकर व इतर उपस्थित होते
0 Comments