सहा आरोपी गजाआड : संकेश्वर पोलिसांची कारवाई
जिल्हा पोलिस प्रमुखांनी केले कौतुक
बेळगाव / प्रतिनिधी
अपहरण प्रकरणाचा त्याच दिवशी छडा लावून अपहृत मुलाचा शोध घेणाऱ्या संकेश्वर पोलिसांच्या कार्याचे पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी कौतुक केले. संकेश्वर शहरातील एका मुलाचे अपहरण करून पैशांची मागणी करणाऱ्या एकूण ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. वडिलांनी तुला निपाणीच्या रुग्णालयात बोलावले आहे, असे सांगून ट्यूशन संपवून घरी जाणाऱ्या 14 वर्षीय भास्कर प्रकाश काकडे या अल्पवयीन मुलाचे सहा जणांनी अपहरण केले होते. तसेच मुलाच्या सुटकेसाठी पालकांकडे पैशांची मागणी केली. मुलगा घरी न आल्याने पालकांनी नोंदवलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तपास केला. आणि त्याच दिवशी आरोपींना अटक करून मुलाची सुटका केली.
अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी, गोकाकचे डीएसपी मनोजकुमार नाईक, यमकनमर्डीचे सीपीआय रमेश छायागोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणपती कोगनोळी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. आरोपींकडून 3 मोटारसायकली आणि 6 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
0 Comments