अथणीतील कृष्णा शुगर्स नजीकची घटना
अथणी / वार्ताहर
अथणी येथे स्कूल बस टेम्पोची धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही चालक ठार तर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा अपघात झाला आहे.
अथणीतील कृष्णा सहकारी साखर कारखान्यानजीक झालेल्या कारच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरेंद्र मल्लन्नवर (वय 60, रा. तमदाडी, ता. जमखंडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अथणी तालुक्यातील ऐनापुर गावात काविळीचे औषध आणण्यासाठी जात असताना कृष्णा शुगर्स नजीक आपघात झाला. या अपघातात कार रस्ता सोडून सुमारे 200 फूट मक्याच्या शेतात पलटी झाली.
0 Comments