वाहनासह तांदूळ जप्त
रेशनच्या तांदळाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या एकाला होर्ती पोलिसांनी ताब्यात घेतले. विजयपूर जिल्ह्याच्या इंडी तालुक्यातील तावडलगा गावात ही घटना घडली. श्रीधर अण्णाप्पा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या कारवाईत वाहनात भरलेली 50 किलोची प्रत्येकी 31 तर रस्त्याच्या कडेला असलेली 55 किलोची प्रत्येकी 60 पोती जप्त करण्यात आली. याशिवाय तांदळाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी होर्ती पोलीस स्थानकात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments