हारूगेरी पोलिसांची कारवाई : वाहनासह चालक ताब्यात

 रेशनच्या तांदूळसाठ्यासह जप्त करण्यात आलेला टेम्पो 

बेळगाव / प्रतिनिधी

रेशनच्या तांदळाची बेकायदा वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेऊन पोलिसांनी चालकाला अटक केली. या कारवाईत 11 टन 520 किलो तांदूळ जप्त करण्यात आला आहे. यमनाप्पा भीमाप्पा मल्यागोळ असे अटक करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुदलगी तालुक्यातील संगनाकेरी गावातील टेम्पो चालक व मालक यमनाप्पा मल्यागोळ आपल्या ताब्यातील टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक KA-1155 मधून रेशनच्या तांदळाची बेकायदा वाहतूक करत होता. या टेम्पोमध्ये  11 टन 520 किलो तांदळाची 384 पोती होती. अथणी क्रॉसनजीक पोलिसांनी छापा टाकून संबंधित याला ताब्यात घेतले. या कारवाईत 2 लाख 53 हजार 440 रुपये किमतीचा तांदूळ हस्तगत करण्यात आला आहे. हारुगेरी पोलीस स्थानकात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.