48 लाखांचा मुद्देमाल हस्तगत : अबकारी विभागाची कारवाई

विजयपूर / वार्ताहर

विजयपूर तालुक्यातील आलियाबाद गावानजीक अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड घालून 10 बॉक्स दारू जप्त केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गोव्याहून आलियाबादकडे बेकायदा दारूची वाहतूक होत असल्याची माहिती अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून दोन आरोपींना अटक करण्यात आली. कृष्णा रघुनाथ कर्पे (रा. विजयपूर), बिरू राघू मानकर (रा. विजयपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या कारवाईत 10 बॉक्स दारू आणि टाटा सुमो वाहन असा एकूण 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बेळगाव अबकारी विभागाचे आयुक्त मंजुनाथ, विजयपूर अबकारी विभागाचे सीपीआय महादेव पुजारी यांच्यासह सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.