गोल्फ क्लबच्या 'जंगलात'; हत्ती उतरले मोहिमेच्या 'मैदानात'
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावात आज बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सकरेबैल येथून 2 हत्ती दाखल झाले. त्यांच्या सहाय्याने आज सकाळपासूनच बिबट्यासाठी शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.गेल्या 20 दिवसांपासून गोल्फ मैदान परिसरात लपून बसलेल्या आणि बेळगावकरांची झोप उडवलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आता हत्तीची मदत घेण्यात येत आहे. आज बुधवारी सकाळी शिमोगा येथील सकरेबैल येथून दोन हत्ती आणण्यात आले. त्यांच्या मदतीने सकाळपासूनच ऑपरेशन बिबट्या सुरु करण्यात आले. वनमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात जनतेची झोप उडवणाऱ्या या बिबट्याला शोधण्यासाठी हे दोन्ही हत्ती गोल्फ मैदानाच्या झाडीत घुसले आहेत.
बिबट्याला पकडण्यासाठी वन्यजीव तज्ज्ञ डॉ. विनय यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या पथकाने सकरेबैल कॅम्पमधील ‘अर्जुन’ आणि ‘आले’ या हत्तींना प्रशिक्षण दिले आहे. आता वन्यजीव तज्ज्ञ डॉक्टर आणि माहुतांसह आठ जणांची टीम या ऑपरेशनमध्ये सहभागी झाली आहे.
0 Comments