कर्नाटक माध्याम मान्यता समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झालेल्या ज्येष्ठ पत्रकार व जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे मुख्य सचिव मोहन कुलकर्णी यांचा सत्कार जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला.
जिल्हा पत्रकार भवनात झालेल्या या सत्कार समारंभात बोलताना पत्रकार संघाचे अध्यक्ष संगमेश चुरी म्हणाले, वीस वर्षांनंतर कर्नाटक माध्यम मान्यता समितीच्या सदस्यपदी विजयपूर जिल्ह्यास प्रतिनिधित्व मिळाले असून, ज्येष्ठ पत्रकार व जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे मुख्य सचिव मोहन कुलकर्णी यांची समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केल्याचे आदेश पत्र सरकारच्या वतीने काढण्यात आले आहे.
जिल्हा पत्रकार संघास अभिमानास्पद असून, आम्हास आनंद झाला असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, मोहन कुलकर्णी यांनी या भागातील योग्य पत्रकारांना माध्यम मान्यता ओळख पत्र मिळवून देण्यासाठी व पत्रकारांना सरकारच्या वतीने देण्यात येणारा सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष इंदूशेखर मनूर, राज्य कार्यकारिणी सदस्य के.के. कुलकर्णी, माजी अध्यक्ष शरनू मसळी, सिताराम कुलकर्णी, राजू कोंडगोळी, देवेंद्र हळवार, सचेंद्र लंबू, खजिनदार राहुल आपटे, सह खजिनदार दिपक शिंत्रे,व इतर सदस्य उपस्थित होते.
0 Comments