तब्बल 116 किलो गव्हाच्या पोत्यासह पार केले 9 किमी अंतर

विजयपूरचा बाहुबली अशी ओळख : कामगिरीचे सर्वत्र कौतुक

विजयपूर /प्रतिनिधी

चित्रपटात आपण धाडसी स्टंट नेहमीच पाहत असतो. पण येथे  एका युवकाने प्रत्यक्षात साहसी स्टंट करून दाखवला आहे.

तब्बल 116 किलो वजनाचे गव्हाचे पोते उचलून  नऊ किलोमीटर अंतर पार करण्याचा विक्रम विजयपूर जिल्ह्याच्या   देवरहिप्परगी तालुक्यातील चिक्करुगी गावच्या प्रकाश बैरवाडगी तरुणाने केला आहे.

त्याने देवरहिप्परगी  तालुक्यातील मुळसावळगी क्रॉस ते चिक्करुगी पर्यंत प्रवास केला. 116 किलो वजनाचे गव्हाचे पोते घेऊन प्रवास करत असताना, त्याच्या मित्रांनी त्याला टॉवेलने वारा घातला. शक्तिप्रदर्शनसाठी साहसी कामगिरी करणाऱ्या प्रकाशला मित्रांनी 50 ग्रॅम चांदीचे ब्रेसलेट दिले. प्रकाश या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.