क्लब रोडवर हाय अलर्ट जाहीर...!
बेळगाव / प्रतिनिधी
गोल्फ क्लब परिसरात वनविभागाला सातत्याने हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम आज 23 व्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान सोमवारी त्याठिकाणी बिबट्याने रस्तावर आणला त्या भागात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. क्लब रोड, मिलीटरी विनायक मंदिर, हिंडलगा व बेळगाव परिसरात दक्षता घेण्यात आली आहे.
गोल्फ कोर्सच्या जंगलात बिबट्याचे कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे. डॉ. विनय, यांच्यासहित शार्प शूटर गोल्फ क्लब रोडच्या शेजारी हत्तीवर बसला आहे. कोणत्याही क्षणी बिबट्या लव रोड वरून पळून जाऊ शकतो. यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. बिबट्या आल्यास ट्रॅकविलायझर बंदूकीतून गोळीबार करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव ते हिंडलगा यांना जोडणारे क्लब रोडवर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. 250 एकर पेक्षा जास्त परिसरात तीनशेहून अधिक जवान गस्त घालत आहेत. त्या जवानांनी कोणत्याही परिस्थितीत बिबट्याला जेरबंद करण्याची सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
0 Comments