निपाणी तालुक्याच्या कसनाळ गावातील घटना

निपाणी / वार्ताहर

पावसामुळे घर कोसळून दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना निपाणी तालुक्याच्या कसनाळ गावात घडली. शालन भूपाल भगत यांनी राहत्या घरातील गोठ्यात म्हशी बांधल्या होत्या. मात्र संततधार पावसामुळे घरांची पडझड झाली. याच दरम्यान गोठ्याची भिंत कोसळून दोन म्हशींचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पशुवैद्यकीय अधिकारी त्याठिकाणी फिरकले नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. घटनास्थळी ग्रा. पं. सदस्य अजित पाटील, सचिन शिंदे, अमोल कोळी, किरण जाधव यांनी मशीन ना बाहेर काढण्यास मदत केली.